Advertisement

भाजप आमदार नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं मोठा झटका दिला आहे.

भाजप आमदार नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं मोठा झटका दिला आहे. कोर्टानं त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राणेंना आजची आणि उद्याची रात्र कणकवली पोलीसांच्या कोठडीतच काढावी लागणार आहे.

नितेश राणे यांनी आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तर सरकारी वकिलांकडून नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या मागणीसाठी पोलिसांनी सबळ कारणे दिले. त्यामुळे नितेश राणेंना पोलिस कोठडी सुनावली आहे.

कणकवली दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथक न्यायालयाबाहेर तैनात होते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले. १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते.


हेही वाचा

हे लोकांसाठीचे बजेट असेल जुमला बजेट नसेल - किशोरी पेडणेकर

युतीच्या चर्चेत पडू नका, निवडणुकीच्या तयारीला लागा - राज ठाकरे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा