Advertisement

उर्मिलाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल

काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उर्मिलाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल
SHARES

काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धनंजय कुडतरकर (५७) असं या व्यक्तीचं नाव असून तो पुणे इथं राहणारा आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुन्हा दाखल

धनंजय कुडतरकर याच्याविरोधात कलम ३५४() () णि आयटी अधिनियमनच्या कलमांर्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


अटक कधी ?

काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी तिचा पराभव केला. मात्र, उर्मिलाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या अटक करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

मुंबईत १.४१ लाख मोटारसायकल चालकांवर कारवाई

'परे'वरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १३.९७ लाखांचा दंड वसूल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा