Advertisement

आणीबाणीत तुरूंगवास भोगणाऱ्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव


आणीबाणीत तुरूंगवास भोगणाऱ्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार होणार आहे.


संवाद सभेचं आयोजन

तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ साली देशात आणीबाणी जाहीर केली होती. या दिवसाच्या निमित्ताने भाजपाने बिर्ला मातोश्री सभागृहात संवाद सभेचं आयोजन केलं आहे. प्रमुख संवादक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्तिथ राहणार आहेत.


लोकशाहीवर आघात

इंदिरा गांधी सरकारने २६ जून रोजी देशावर आणीबाणी लादून लोकशाहीवर आघात केला. त्यावेळी आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी मुंबई भाजपाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचं पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं.


काँग्रेसची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीत १ महिन्यापेक्षा अधिक काळ तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा १० हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा-

काकाला पुतण्याची भीती का? रामदास कदम यांचा राजला टोला

टारझन द 'आप ' मॅन ...!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा