मुंबई - मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मुंबईत रविवारी मराठा क्रांती मूक मोर्चाची बाइक रॅली निघाली. सर्व पक्षातील नेते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मोठमोठ्या कारमधून येणारे नेते या वेळी बाइकवरून या रॅलीत सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसचे भाई जगताप, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, शिवसेनेचे नेते सुधीर मोरे, मनसेचे नेते संदीप दळवी आदी नेत्यांचा समावेश होता.