Advertisement

'ही तर मोदी सरकारची हिटलरशाही'


'ही तर मोदी सरकारची हिटलरशाही'
SHARES

घाटकोपर - रमाबाई आंबेडकरनगरमध्ये रिपब्लिकन सेनेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभा झाली. या वेळी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मोदी सरकारनं पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय गोपनीय ठेवला होता. मोदी सरकारनं संसदेला विश्वासात घेऊन हा निर्णय सांगितला नाही. मोदी सरकारची ही हिटलरशाही असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच आनंदराज आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा मोर्चाचंही समर्थन केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा