मुंबई- चलनबंदीनंतर शिवसेनेची अजूनही तळ्यातमळ्यात दौड सुरूये. पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळानं रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात 500 आणि 1000 च्या चलनबंदीमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली. काँग्रेसला मात्र शिवसेनेची भूमिका स्वाभाविकपणे दुटप्पी वाटतेय.
या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत आधी रिझर्व्ह बँकेवर धडक मोर्चा आणि मग गव्हर्नरांना निवेदन असा कार्यक्रम शिवसेनेनं जाहीर केला होता. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी भेट झाली आणि चक्र फिरले. धडक मोर्चा रहित झाला आणि निवदेन सादर करण्याचे उपचार सुरू राहीले.