सह्याद्रीनगर - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भांडुपमध्ये मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून बुधवारी सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सेनेच्या सह्याद्रीनगर येथील कार्यालयास भेट दिली.
शिवसेना पक्ष नेतृत्वाने खासदार विनायक राऊत आणि आदेश बांदेकर यांच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे राऊत यांनी या भागाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या भेटीवेळी आमदार अशोक पाटील, शाखाप्रमुख उमेेश माने यांनी त्यांचा सत्कार केला.
सेनेकडून पालिका निवडणूकीची तयारी सुरू झाली असतानाच भांडुपमधील सेनेचे तीन पदाधिकारी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. भाजपकडून आपल्याला पालिका निवडणुकीचे तिकीट मिळेल या अपक्षेवर ते भाजपा प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मात्र या पदाधिकाऱ्यांना सोमय्या यांनी वेटिंगवर ठेवले आहे.