Advertisement

परिचारकांच्या निलंबनावरून खडाजंगी कायम


परिचारकांच्या निलंबनावरून खडाजंगी कायम
SHARES

गेल्याच आठवड्यात आवाजी बहुमताद्वारे प्रशांत परिचारक यांचं निलंबन रद्द केल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली होती. या निलंबनाला सोमवारी पुन्हा एकदा शिवसेनेतर्फे कडाडून विरोध करण्यात आला. आ. ॲड. अनिल परब यांनी हे निलंबन कायम ठेवण्यासाठी पुन्हा ठराव मांडता येईल का? अशी विचारणा करताच सभागृहात गदारोळ झाला.


राष्ट्रद्रोहाच्या बरोबरीचं वक्तव्य

परिचारक यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे शहिदांचा अपमान आहे, असं सांगत परब यांनी शहिदांचा अपमान सभागृहाला मान्य नसल्याचं सांगितलं. त्यांनी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रद्रोहाच्या बरोबरीचं असल्याचं म्हणत त्यांचं निलंबन मागे न घेण्याची आक्रमक मागणी केली.


पाटील विरूद्ध पाटील

निलंबनाच्या मुद्द्यावरून आ. कपिल पाटील यांनी सरकारच्या विचारसरणीवर सडकून टीका केली. परिचारकांना पुन्हा सभागृहात बसायला दिल्यास घातक परंपरा सुरु होईल. सभागृहाच्या प्रथा आणि परंपरेला छेद देणारी सरकारची विचारसरणी असल्याची टीका अशी पाटील यांनी करताच सभागृह नेते चंद्रकांत पाटील आक्रमक झाले. त्यांनी पाटील यांनी हा मुद्दा विचारधारेशी जोडू नये, असं म्हणत कपिल पाटील यांना धारेवर धरलं. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पहायला मिळाली.



हेही वाचा-

परिचारक निलंबनावरून शिवसेना आक्रमक

परिचारकांचं निलंबन कायम ठेवा, शिवसेनेची मागणी



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा