शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांच्यात राजकीय मतभेद असले, तरी वेळोवेळी बाळासाहेब यांनी इंदिरा गांधी यांचे कौतुकही केले, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केले. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबद्दलच्या प्रस्तावावर विधानपरिषदेत चर्चा करताना त्या बोलत होत्या.
1984 साली जेव्हा इंदिराजींचे निधन झाले, त्यावळी विझलेल्या पणतीतून बाळासाहेबांनी इंदिराजींचे चित्र रेखाटले होते. त्यात त्यांनी शब्दांची गरज नाही, देश अंधारला आहे, अशा शब्दांत आपली भावना व्यक्त केली होती, असेही गोऱ्हे म्हणाल्या.
1979 साली जेव्हा मेढक आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून इंदिराजी निवडून आल्या होत्या, त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी ‘दी ग्रेट रॉयल सर्कस’ नावाने व्यंगचित्र रेखाटले होते. एकाचवेळी दक्षिण भारतातून आणि उत्तर भारतातून निवडून येण्यासाठी इंदिराजींनी जे कष्ट घेतले होते. ते चित्राच्या माध्यमातून रेखाटले होते, असेही गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा -
इंदिरा गांधी...राजीव गांधी..आणि विधिमंडळातला गोंधळ!
मुख्यमंत्र्यांनी केलं इंदिरा गांधींच्या फोटोला अभिवादन