Advertisement

महाराष्ट्र सरकारने लसीचं राजकारण बंद करावं- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने लसीचं राजकारण बंद केलं पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणं बंद केलं पाहिजे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने लसीचं राजकारण बंद करावं- देवेंद्र फडणवीस
SHARES

एका बाजूला महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला असताना केंद्र आणि राज्यातील संघर्षही अधिक तीव्र होताना दिसतोय. महाराष्ट्रात पुढचे ३ दिवस पुरेल इतकाच कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली होती. त्यावर निशाणा साधताना राज्य सरकारने लसीचं राजकारण बंद केलं पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणं बंद केलं पाहिजे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली आहे.

महाराष्ट्रात लसीचे केवळ १४ लाख डोस शिल्लक आहेत. दररोज ५ लाख डोसच्या सरासरीनुसार हा साठा ३ दिवसांत संपून महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडू शकतं. म्हणूनच महाराष्ट्राला दर आठवड्याला किमान ४० लाख लशींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांच्याकडे केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली. 

हेही वाचा- महाराष्ट्रात ३ दिवसांत बंद पडू शकतं लसीकरण, फक्त १४ लाख डोस शिल्लक

त्यावर लशींचा तुटवडा असल्यासंदर्भात महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी केलेली वक्तव्य म्हणजे कोरोनाची साथ (coronavirus) आटोक्यात आणण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न असल्याचं दिसतं. राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून संसर्ग रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. त्यात लशीच्या साठ्यावरून लोकांमध्ये घबराट निर्माण करणं म्हणजे समस्येत आणखी भर घालण्यासारखं आहे. 

कोणत्या राज्याला किती लशींचा पुरवठा होत आहे, याची अद्ययावत माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय घेत असतं. राज्य सरकारच्या लशींच्या गरजेचा सातत्याने आढावा घेतला जातो.. त्यामुळे लशींचा तुटवडा असल्याचा महाराष्ट्राचा दावा तथ्यहीन आहे, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी टोपे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

तर, आरोग्यमंत्र्याचं पत्र काल आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला झालेल्या लसींच्या पुरवठ्यासंबंधीची आकडेवारी दिली आहे. टीक करणाऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे की, महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुरवठा राज्याला करण्यात आला आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकारने लसीचं राजकारण बंद केलं पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणं बंद केलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(stop politics over covid  vaccine says devendra fadnavis to maharashtra government)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा