Advertisement

कोरोनामुळं अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये- सुप्रिया सुळे

कोरोनामुळं अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये. त्यासाठी दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्यानं काम करण्याची आवश्यकता आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळं अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये- सुप्रिया सुळे
SHARES

राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. शिवाय अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांनाही गमावलं. त्यामुळं अशा मुलांना आधार देण्याची गरज आहे. कोरोनामुळं अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये. त्यासाठी दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्यानं काम करण्याची आवश्यकता आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे डोक्यावरचं छत्र हरपलेल्या मुलांच्या प्रश्नावरुन सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. राज्यात आणि देशात अनेक मुलांचे पालक कोरोनामुळे दगावल्यानं मुलं अनाथ झाली आहेत. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचं कोरोनानं निधन झाल्यामुळं मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

'मुलं देशाचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी देखील आहे', असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - शरद पवारांच्या भेटीला राजकीय अन्वयार्थ नाही- देवेंद्र फडणवीस

कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळं पालक गमवलेल्या अनाथ मुलांना उभं करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजने अंतर्गत या मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. आई-वडील किंवा त्यापैकी एकाला गमावलेल्या मुलांना वयाच्या १८ व्या वर्षी मासिक सहाय्यता निधी आणि वयाच्या २३ व्या वर्षी पीएम केअर्समधून १० लाख रुपये देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा - 

'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा हाय अलर्ट

मुंबई मॉडेलचं अनुकरण अन्य शहरांत सुरू


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा