Advertisement

ट्रू वोटर अॅप्लिकेशनचा पर्याय फसला


ट्रू वोटर अॅप्लिकेशनचा पर्याय फसला
SHARES

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने ट्रू वोटर अॅप्लिकेशन मतदारांच्या विविध सोयीसाठी बनवलं होतं. ज्याचा सर्व डेटाबेस राज्यशासनाच्या स्टेट डेटा सेंटरमध्ये ठेवला आहे. परंतु ऐन मतदानाच्या दिवशी मतदार आपले नाव ट्रू वोटरवर शोधत असताना सर्व्हर एरर येत होता.
त्यामुळे नाव शोधताना मतदारांची चांगलीच धावपळ उडाली. या विषयी राज्य तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी मुकेश सोमकुवर यांना फोन वरुन विचारलं असता सर्व्हरचा वापर 84 टक्के झाल्यामुळे असा प्रकार घडला असावा, आता सर्व्हरमध्ये अधिक जागा उपलब्ध करुन दिली आहे. पुढे असं होणार नाही असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तर, माहिती तंत्रज्ञान सचिव गौतम यांना विचारलं असता त्यांनी निवडणूक आयोगाला याबद्दल विचारा असं सांगून हात झटकले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा