Advertisement

भाजपाच्या टीकेमुळे शिवसेनेचे नेते त्रस्त


भाजपाच्या टीकेमुळे शिवसेनेचे नेते त्रस्त
SHARES

मुंबई - शिवसेना, भाजपाची युतीसाठी एकीकडे चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. कीती वर्ष एकाच कुटुंबाकडे सत्ता दिली जाणार. भाजपाच्या अटीवरच शिवसेनेला युती करावी लागेल असे वक्तव्य भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केले. सोमय्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेच्या काही नेत्यांनी निषेध करत ‘मातोश्री’वर धाव घेत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. जोपर्यंत भाजपा टीका थांबवत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही, अशी नाराजी शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली. असेच असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी, असेही शिवसेना नेत्यांनी म्हटलेय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा