महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यू. पी. एस. मदान यांची राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ज. स. सहारिया यांचा कार्यकाळ बुधवार ४ सप्टेंबर रोजी संपल्याने त्यांच्या जागी निवडणूक आयुक्त म्हणून गुरूवारी मदान यांनी पदभार स्वीकारला.
मदान हे १९८३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. त्याशिवाय त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही सेवा बजावली आहे. सोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते.
आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मदान यांचं स्वागत केलं. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा-
विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचा १२५-१२५ फॉर्म्युला
भुजबळांना शिवसेनेत ‘नो एण्ट्री’- संजय राऊत