आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये नफावसुली दिसून आली आहे. त्यामुळे दोन्ही निर्देशांक घसरून बंद झाले. सेन्सेक्स १८ अंकांच्या घसरणीसह ५३१४० अंकावर बंद झाला. तर निफ्टी १५९२३ अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारावर तिमाही आकडेवारीचा देखील प्रभाव दिसून आला. एचडीएफसी, एल अँड टी फायनान्स होल्डींग, जस्ट डायल, डिजिटल मीडिया, डेन नेटवर्क्स या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले. बाजार सुरू होताच सेन्सेक्सने ७० अंकाची वाढ नोंदवली होती. तर निफ्टी १५९५० अंकांपर्यंत गेला होता.
सेन्सेक्समधील आयटीसी, एचसीएल टेक, एचडीएफसी, एशियन पेंट, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, डॉ. रेड्डी लॅब, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्ये वाढ झाली. तर बजाज फिनसर्व्ह, एल अँड टी, आयसीआएसीआय बँक, इन्फोसिस, टेक महिंद्रा हे शेअर घसरले.
निफ्टीमध्ये आयशर मोटर, एचसीएल टेक, ओएनजीसी, इंडियन ऑइल, टाटा कंझुमर, श्री सिमेंट या शेअरमध्ये घसरण झाली. तर सिप्ला, सन फार्मा, भारती एअरटेल, विप्रो हे शेअर्स वधारले.