शेवटच्या एक तासामध्ये झालेल्या खरेदीमुळे देशातील शेअर बाजार शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी वधारून बंद झाले. सेन्सेक्स १६६ अंकाने वाढून ५२,४८४ वर बंद झाला. तर निफ्टीही ४२ अंकाने वधारून १५,७२२ वर स्थिरावला.
शुक्रवारी शेअर बाजारात आयटी आणि धातू कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली आहे. पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअरमध्ये विक्रीचा सपाटा राहिला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीची कामगिरी निराशाजनक होती. मात्र, शेवटच्या तासात झालेल्या घरेदीमुळे दोन्ही निर्देशांक सावरले.
आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराला मोठे बळ मिळाले. सुरुवातीच्या सत्रात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याने गुंतवणूकदारांनी छोट्या व मध्यम शेअर्समध्ये मोठी खरेदी केली. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक ०.३३ टक्के वाढीसह बंद झाला. तर निफ्टीचा स्मॉल कॅप निर्देशांक १.०१ टक्के वाढला.
निफ्टीच्या मेटल इंडेक्समध्ये १.४० टक्के घसरण झाल्याने बाजारावर मोठा दबाव होता. मात्र, निफ्टीच्या फार्मा, मीडिया, रिअल्टी, वित्तीय सेवा, बँकिंग, वाहन आणि ऊर्जा निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली.
हेही वाचा -