Advertisement

चौफेर खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी वधारले


चौफेर खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी वधारले
SHARES

जुलै महिन्याच्या वायदे व्यवहारांच्या समाप्तीच्या दिवशी देशातील शेअर बाजार वधारले. आयटी, मेटल आणि फायनान्शिअल शेअर्सने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे सेन्सेक्स 209.36 अंकाने वधारून 52,653.07 वर बंद झाला. तर निफ्टी 69.10 अंकांची वाढ नोंदवत 15,778.50 वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजारात 1781 शेअर्स वधारले. तर 1170 शेअर्स घसरले. 109 शेअर्सच्या भावात बदल झाला नाही. निफ्टीमध्ये हिंडाल्को, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील  हे शेअर्स तेजीत राहिले. तर मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, आयटीसी, बजाज ऑटो आणि कोल इंडिया हे शेअर्स घसरले. 

बाजारात झालेल्या चौफेर खरेदीमुळे लहान आणि मध्यम कंपन्यांच्या शेअर्स वधारले. मेटल आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्सने सर्वाधिक वाढ नोंदवली. तर एफएमसीजी निर्देशांकात 1 टक्क्यांनी घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.4 - 0.9 टक्क्यांनी वधारले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा