Advertisement

बँकिंग, धातू कंपन्यांच्या शेअर्समधील विक्रीने घसरण

मंगळवारी सेन्सेक्स ६० अंकांनी वधारून उघडला. तर निफ्टी ७ अंकांच्या घसरणीने उघडला.

बँकिंग, धातू कंपन्यांच्या शेअर्समधील विक्रीने घसरण
SHARES

देशातील शेअर बाजार (share market) मंगळवारी झालेल्या चौफेर विक्रीमुळे घसरून बंद झाले. सेन्सेक्स (sensex) १८६ ने घसरून ५२,५५० वर बंद झाला. तर निफ्टी (nifty) ६६ अंकांची घट नोंदवत १५,७४८ अंकांवर बंद झाला. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेल्या नुकसानीमुळे केंद्र सरकारकडून आणखी एक पॅकेज जाहीर करण्यात आलं. मात्र यामध्ये बँकिंग क्षेत्राला डावलण्यात आल्याने त्याचे पडसाद बँकांच्या शेअर्सवर दिसून आले. इंडियन बँक, युको बँक, बंधन बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एचडीएफसी बँक,अॅक्सिस बँक या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

याशिवाय धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री झाली. हिंदाल्को, सेल, जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल स्टील, टाटा स्टील या प्रमुख शेअर्समध्ये घसरण झाली.

मंगळवारी सेन्सेक्स ६० अंकांनी वधारून उघडला. तर निफ्टी ७ अंकांच्या घसरणीने उघडला. आशियातील महत्त्वाच्या शेअर बाजारामध्ये एक टक्क्यांपर्यंत घसरण झाला. त्याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून आला. संपूर्ण सत्रात शेअर बाजारात विक्रीचा दबाव होता. 

पीएसयू बँक, मेटल, ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेस, मीडिया, रियल्टी आणि आयटी शेअर्समध्ये मंगळवारी मोठा विक्रीचा दबाव राहिला. एफएमसीजी आणि फार्मा कंपन्यांमध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टीतील घसरण रोखली गेली. अजंता फार्मा, सन फार्मा, फायझर, अल्केम लॅबच्या शेअर्सने वाढ नोंदवली. 

मात्र, ओएनजीसी, आयओसी, हिंडाल्को, कोल इंडिया, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा आणि बजाज ऑटो आदी शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात घसरण पहलायला मिळाली. पॉवर ग्रिड, सिप्ला, एनटीपीसी, एचयूएल, दिवी लॅब, डॉ. रेड्डीज लॅब आणि नेस्ले इंडिया आदी शेअर्स वधारले. 




हेही वाचा -

  1. पॅन कार्ड हरवलंय, खराब झालंय? असं मिळवा नवीन पॅन कार्ड

  2. रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा