Advertisement

सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी कोसळले

देशातील शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली.

सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी कोसळले
SHARES

देशातील शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. दिवसाअखेर सेन्सेक्स १८२ अंकांनी घसरून ५२,३८६ वर बंद झाला. तर निफ्टीही ३८ अंकांच्या घसरणीसह १५,६८९ वर बंद झाला.

वाहन आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. तर धातू कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील ३० पैकी १९ शेअर्स घसरले. एशियन पेंट, आयटीसी, नेस्ले, मारुती, एचडीएफसी, ऍक्सिस बँक, बजाज ऑटो, एल अँड टी, महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, एसबीआय या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर टाटा स्टील, डॉ. रेड्डी लॅब, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, टायटन, टेक महिंद्रा, सन फार्मा या शेअर्समध्ये वाढ झाली.

बीएसईवर ३३५३ शेअर्सची विक्री झाली. त्यापैकी १९१२ शेअर्स वधारले. तर १२८६ शेअर्स घसरले. सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भागभांडवल २३१.१५ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

गुरूवारीही बाजारात घसरण झाली होती. दोन सत्रांमध्ये सेन्सेक्स ३४० अंकांनी घसरला असून निफ्टीत ७७ अंकांची घट झाली आहे. दोन सत्रात झालेल्या पडझडीने गुंतवणूकदारांना जवळपास एक लाख कोटींचे नुकसान झाले आहे.



हेही वाचा -

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा