देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आगामी काळात लाॅकडाऊन लागू होण्याची भिती आहे. या भीतीने सोमवारी गुंतवणूकदारांची गाळण उडाली. त्यामुळे देशातील शेअर बाजार आपटले. बाजार उघडताच झालेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले. सेन्सेक्स तब्बल १४०० अंकाने तर निफ्टी ३५० अंकाने कोसळला.या प्रचंड मोठा पडझडीत १५ मिनिटात गुंतवणूकदारांच्या तब्बल ७ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला.
जागतिक बाजारात देखील मोठी पडझड दिसून आहे. गुंतवणूकदारांनी बँका, वित्त संस्था, ऑटो या क्षेत्रात विक्रीचा मारा सुरु ठेवला आहे. महाराष्ट्रात राज्यात कोणत्याही क्षणी लाॅकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर केंद्र सरकारकडूनही कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहे. त्यामुळेच त्यांनी बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे.
सकाळी सेन्सेक्स ६३४.६७ अंकांनी घसरून ४८,९५६.६५ वर उघडली. दिवसभर झालेल्या पडझडीनंतर सेन्सेक्स १७०७ अंकांच्या घसरणीसह ४७,८८३ वर बंद झाला. यामुळे गुंतवणूकदारांना ८.४ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. यापूर्वी २९ जानेवारीला सेन्सेक्स ४८ हजारांच्या खाली ४६,२८५ अंकांवर बंद झाला होता. निफ्टीही ५२४ अंकांनी कोसळून १४,३१० वर बंद झाला
सेन्सेक्समधील ३० पैकी २९ शेअर्समध्ये घसरण झाली. निर्देशांकात इंडसइंड बँकेचा शेअर्स सर्वाधिक ८. ६ टक्के घसरला.
हेही वाचा -
मार्चमध्ये सोन्याच्या आयातीत तब्बल ४७१ टक्के वाढ, 'हे' आहे कारण