Advertisement

सेन्सेक्स, निफ्टी किरकोळ वाढीने बंद

सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स २३५.०७ अंकांच्या वाढीसह ५२८०९.५३ वर उघडला. तर निफ्टी ७६ अंकांच्या वाढीसह १५८२२.५० वर उघडला.

सेन्सेक्स, निफ्टी किरकोळ वाढीने बंद
SHARES

आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी देशातील शेअर बाजार (share market) किरकोळ वाढीने बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (sensex) १४ अंकांनी वाढून ५२,५८८ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (nifty) २६ अंकाने वधारून १५,७७३ वर बंद झाला. 

सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स (sensex) २३५.०७ अंकांच्या वाढीसह ५२८०९.५३ वर उघडला. तर निफ्टी ७६ अंकांच्या वाढीसह १५८२२.५० वर उघडला. यानंतर, सेन्सेक्सने दिसभरात ५३ हजारांच्या पातळीला स्पर्श केला.

सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी १८ शेअर्स वधारले. तर निफ्टीतील ५० शेअर्स पैकी २८ शेअर्स तेजीसह बंद झाले. मंगळवारी यूपीएल, मारुती, श्री सिमेंट, एसबीआय लाइफ आणि विप्रो यांचे शेअर्स वधारून बंद झाले. दुसरीकडे बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स घसरून बंद झाले.

सोमवारी दिवसभरातील चढ-उतारानंतर सेन्सेक्स २३०.०१ अंकांनी वधारून ५२,५७४.४६ वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी ६३.१५ अंकांच्या वाढीसह १५,७४६.५० वर बंद झाला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा