मुंबईतील दृष्टीहिन वैज्ञानिकानं पुलावामा हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना ११० कोटी रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुर्तजा अली असं या वैज्ञानिकाचं नाव असून ते आपल्या कमाईतून ही रक्कम देणार आहेत.
मुर्तजा अली यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. पंतप्रधानांची भेट घेऊन ते ११० कोटी रूपयांचा धनादेश त्यांच्याकडं सोपवतील. येत्या काही दिवसात पंतप्रधानांशी त्यांची भेट होणार आहे. मुर्तजा यांना नुकतीच फ्युएल बर्न टेक्नॉलॉजीच्या निर्मितीसाठी एका कंपनीने ११० कोटींची रक्कम दिली होती.
मुर्तजा अली हे जन्मापासूनच दृष्टीहिन आहेत. त्यांनी कोट्यातील कॉमर्स कॉलेमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तसंच त्यांचा ऑटोमाबाईलचा वडिलोपार्जित व्यवसायही आहे. त्यांनी नुकताच फ्युएल बर्न टेक्नॉलॉजिचा आविष्कार केला असून रेडिओ टेक्नॉलॉजिच्या साहाय्याने जीपीएस किंवा कॅमेऱ्याशिवाय कोणत्याही वाहनाला ट्रेस करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा -
चंदा कोचर यांची ११ तास ईडीकडून चौकशी
चांदीप बंदरावर स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ