महालक्ष्मी - दिवाळी म्हंटलं की या उत्सवाच्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरु होते. अजेकजण हा आनंदोत्सव साजरा करत असताना समाजातील काही घटक मात्र आनंदापासून कोसो दूर असतात. गरीब आणि अनाथ मुलांचेही काहीसे असेच असते. मात्र या मुलांची यंदाची दिवाळी सलाम बॉम्बे आणि मधू मेहता फाऊंडेशनने संस्मरणीय बनवली आहे. या संस्थेच्यावतीने या लहानग्यांसाठी मेजवानी ठेवण्यात आली होती. यावेळी त्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या. या मेजवानीत शहरातील 26 अनाथालयांतील 1500 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. ही संस्था गेल्या 37 वर्षापासून अशा अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. मेजवानीसह या वेळी सलाम बॉम्बे अकॅडेमी ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या अनाथ मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. झिंगाट गाण्यावर इथले चिमुकले सैराट होऊन नाचले. त्यामुळे दिवाळी येण्याआधीच या चिमुकल्यांची दिवाळी मोठ्या दणक्यात साजरी झाली असंच म्हणावं लागेल.