Advertisement

'या' गुरुद्वारात वाजतं सायलेंट भजन

आरती, भजन यामुळे मनाला शांती मिळते. मान्य, पण मोठ-मोठ्या आवाजात वाजवल्यानं शांतता लाभत तर नाहीच. पण ध्वनी प्रदूषण मात्र नक्की होतं. उल्हासनगर इथल्या गुरुद्वार समितीनं या समस्येवर संकल्पना राबवली आणि ती यशस्वीही झाली.

'या' गुरुद्वारात वाजतं सायलेंट भजन
SHARES

वाढत्या लोकसंख्येसोबतच भारतामध्ये प्रदूषणाचं प्रमाणदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. वायू, जल यासोबतच ध्वनी प्रदूषण ही सध्याच्या घडीला सर्वात मोठी समस्या आहे. प्रदूषण रोखण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी प्रयत्न करत आहेत. असाच पुढाकार उल्हासनगरमधल्या गुरुद्वारानं घेतला आहे.


ध्वनी प्रदूषणावर उपाय

कल्पना करा, तुम्ही कुठल्याही एखाद्या धार्मिक स्थळी गेलात आणि तिथं भजन, आरती किंवा इतर धार्मिक संगीत वाजत नाही. अशी कल्पना करणं सर्वांनाच कठीण जात असेल. पण धार्मिक स्थळी मोठ-मोठ्या वाजवण्यात येणारी आरती, भजनं हे देखील ध्वनी प्रदूषणास जबाबदार असलेल्या कारणांपैकी एक कारण आहे. यात काहीच शंका नाही की आरती, भजन यामुळे मनाला शांती मिळते. मान्य, पण मोठ-मोठ्या आवाजात वाजवल्यानं शांतता लाभत तर नाहीच. पण ध्वनी प्रदूषण मात्र नक्की होतं. उल्हासनगर इथल्या गुरुद्वार समितीनं या समस्येवर संकल्पना राबवली आणि ती यशस्वीही झाली.

Advertisement


सत्संगसाठी हेडफोन

अमरीतवेला ट्रस्टनं चक्क गुरुद्वारात आयोजित एका सत्संगसाठी हेडफोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णय घेतला नाही तर त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. तब्बल ४३ दिवस चालणाऱ्या या सत्संगसाठी १० हजार हेडफोन्स मागवले. मोठ्या स्पिकरवर ऐकण्यापेक्षा हेडफोन्सवर सायलंट भजन ऐकता यावं हा त्यांचा हेतू आहे. त्यांच्या या संकल्पनेला नागरिकांनी देखील पाठिंबा दिला.


तंत्रज्ञानाचा योग्य वापर 

पर्यावरणप्रेमी सुमेरा अब्दुलअली यांनी देखील गुरुद्वाराच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्या म्हणाल्या, अशा संकल्पना इतरांनी देखील राबवण्याची गरज आहे. सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रमांमध्ये याचा वापर करणं गरजेचं आहे. कारण यामुळे ध्वनी प्रदूषण रोखता येऊ शकतं. गुरुद्वारानं घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे यात काहीच शंका नाही. तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा हे यांच्याकडून शिकलं पाहिजे. याचा बोध इतरांनी देखील घ्यावा हीच अपेक्षा.

Advertisement



हेही वाचा

सौर उर्जेवर चालणारी मशीद

१२५ फूट साडीवर साकारला जिजाऊंचा जीवनप्रवास



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा