Advertisement

कोरोनाबाधीत रुग्णांना ‘गोलार’ रोबोटमार्फत औषधे, पाणी, जेवणाचा पुरवठा


कोरोनाबाधीत रुग्णांना ‘गोलार’ रोबोटमार्फत औषधे, पाणी, जेवणाचा पुरवठा
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात चालला आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी महापालिकेच्या विविध रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. मात्र उपचारादरम्यान व कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळं या कर्मचाऱ्यांच्या कोरोनाबाधितांशी संपर्क होऊ नये यासाठी महापालिकेनं अनोखी शक्कल लडवली आहे.

महापालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागानं कोरोना कक्षात काम करणारे वॉर्डबॉय आणि परिचारिकांचा राबता कमी होण्यासाठी अभिनव शक्कल लढवली आहे. पोद्दार रुग्णालयातील कोरोनाच्या कक्षात ‘गोलार’ रोबोटच्या साहाय्याने औषधे, जेवण, पाणी, चहा दिला जात आहे. त्यामुळं वॉर्डबॉय आणि कर्मचाऱ्यांचा कक्षातील वावर मर्यादित होऊन त्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी झाला आहे.

कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असलेल्या कक्षात कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालूनच जावे लागते. कोरोना केंद्रात एका वेळी अनेकांना किट वापरावे लागतात. मात्र रोबोटच्या माध्यमातून सेवा दिल्यामुळे हा खर्च वाचणार आहे. कक्षाबाहेरील एक कर्मचारी रोबोमधील ट्रेमध्ये रुग्णांसाठी जेवण, औषधे ठेवतो.

रुग्णालयाच्या नियंत्रण कक्षातून लॅपटॉपद्वारे या रोबोटला सूचना दिल्या जातात. संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीचा हा रोबो तरुणांनी महापालिकेच्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार्टअपमधून बनवला असून त्याची किंमत केवळ १ लाख रुपये आहे. कंपनी सामाजिक दायित्वातून हा रोबोट घेण्यात आल्याची माहिती मिळते.

या रोबोमुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण आणि त्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होणार आहे. हा बॅटरीवर चालणारा असून ४ ते ५ तास चालतो. तो मोबाइलवरून नियंत्रित केले जाऊ शकतो. १०० मीटर अंतरावरून नियंत्रित केल्यामुळे कोणाचाही त्याच्याशी संपर्क येत नाही. जी दक्षिण विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव देवेंद्र गोल्हार असून मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांचेच नाव देऊन या रोबोचे गोलार असे नामकरण केले आहे.



हेही वाचा - 

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण

दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा