Advertisement

मोबाईल क्रमांक १३ आकड्यांचे होणार? खरी गोम इथे वाचा!

सर्व एमटूएम सेवांसाठी १० ऐवजी १३ आकड्यांच्या क्रमांक योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आले होते. त्यामुळे १ जुलै, २०१८पासून सर्व नवीन एमटूएम कनेक्शन्ससाठी १३ आकड्यांचे क्रमांक देण्यात येणार आहेत. त्याशिवाय सध्याच्या १० आकड्यांचे क्रमांकही १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८पर्यंत १३ आकड्यांचे करण्याचेही निर्देश विभागाकडून देण्यात आले आहे.

मोबाईल क्रमांक १३ आकड्यांचे होणार? खरी गोम इथे वाचा!
SHARES

गेल्या काही दिवसांपासून आपण वापरत असलेले मोबाईल क्रमांक येत्या १ जुलैपासून १० अंकांवरून १३ आकड्यांचे होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांना आता आधार कार्डपासून ते बँक खात्यांपर्यंत सर्वच ठिकाणी नंबर कसा बदलायचा? याची चिंता सतावत असेल. पण तुम्हाला चिंता करण्याचं काहीएक कारण नाही. कारण हे क्रमांक आपण वापरत असलेल्या मोबाईलचे नसून ते मशीन टू मशीन अर्थात M2M क्रमांक असणार आहेत!

नक्की काय आहेत दूरसंचार विभागाचे निर्देश?

सर्व एमटूएम सेवांसाठी १० ऐवजी १३ आकड्यांच्या क्रमांक योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आले होते. त्यामुळे १ जुलै, २०१८पासून सर्व नवीन एमटूएम कनेक्शन्ससाठी १३ आकड्यांचे क्रमांक देण्यात येणार आहेत. त्याशिवाय सध्याच्या १० आकड्यांचे क्रमांकही १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८पर्यंत १३ आकड्यांचे करण्याचेही निर्देश विभागाकडून देण्यात आले आहे.

एमटूएम क्रमांक म्हणजे काय?

एमटूएम म्हणजेच मशिन टू मशिन अशी देवाणघेवाण. स्वाईप मशिन, जीपीएस कार, इलेक्ट्रिसिटी मिटर अशा यंत्रांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिमकार्डचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये विशेषकरून दोन यंत्रांमध्ये माहितीची देवाण घेवाण केली जाते.

चिंता का नसावी?

दूसंचार विभागाने दिलेल्या आदेशांनंतर सामान्य जनतेमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र, हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर भारती एअरटेलनं ट्रायला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये हा प्रकार अधिक स्पष्ट केला. 'दूरसंचार विभागानं मंजुरी दिलेले १३ आकड्यांचे क्रमांक हे मशिन टू मशिन प्रणालीसाठी लागू असून सध्या अस्तित्वात असलेल्या मोबाईल क्रमांकांसाठी १० आकड्यांचीच प्रणाली लागू असेल', अशं स्पष्टीकरण करण्यात आलं. त्यामुळे या निर्णयात सामान्य मोबाईलधारकांना घाबरायचं कोणतंही कारण नसल्याचं समोर येत आहे.

जगात सर्वात मोठा क्रमांक

१३ आकड्यांचा क्रमांक लागू झाल्यानंतर कोणत्याही दूरसंचार सेवेसाठी एवढा मोठा एमटूएम मोबाईल क्रमांक असलेला भारत हा एकमेव देश असेल. आत्तापर्यंत चीनमध्ये ११ आकड्यांचा सर्वात मोठा एमटूएम मोबाईल क्रमांक होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा