Advertisement

२३ नोव्हेंबरपर्यंत लोकल प्रवासाची वकिलांनाही परवानगी

मुंबई उपनगरीय लोकलमधून आता मुंबई महानगरातील वकिलांना प्रवासाची परवानगी मिळाली आहे.

२३ नोव्हेंबरपर्यंत लोकल प्रवासाची वकिलांनाही परवानगी
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव (corona) कमी प्रमाणात असून राज्य सरकारनं (state government) अनेक सुविधा सुरू करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनंतर सरसकट महिलांना लोकल प्रवासाची परवानग दिली. त्यानंतर आता मुंबई उपनगरीय लोकलमधून (mumbai local) आता मुंबई महानगरातील वकिलांना  (lawyers) प्रवासाची परवानगी मिळाली आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येत आहे. याबरोबरच वकिलांच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची मुभा मिळाली आहे. सकाळी ८ पर्यंत, नंतर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. महिन्याचा पास मिळणार नाही, फक्त तिकीटावर प्रवास करावा लागणार आहे.

प्रायोगिक तत्वावर वकिलांना न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी ही मुभा देण्यात आली होती. याआधी वकिलांना अत्यावश्यक सेवा समजून लोकल प्रवासाची परवानगी देण्याच्या विनंतीच्या अनेक जनहित याचिका आल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाकडून सर्वच नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सातत्यानं सुनावणी सुरू होती.



हेही वाचा -

महिला प्रवाशांसाठी 'इतक्या' लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार?

कोरोनामुळे बेस्टच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा मृत्यू


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा