Advertisement

आता मुंबईहून कुवेतपर्यंत थेट विमानसेवा सुरू

या सेवेमुळे प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेत लक्षणीय भर पडेल, असा एअर लाईन कंपनीचा दावा आहे.

आता मुंबईहून कुवेतपर्यंत थेट विमानसेवा सुरू
SHARES

अकासा एअर (akasa air) 23 ऑगस्टपासून मुंबई (mumbai) आणि कुवेत (kuwait) दरम्यान सेवा सुरू करणार आहे. सोमवारी अकासा एअरने याबाबत जाहीर केले आहे.

कुवेत शहर आणि मुंबई दरम्यान दररोज ही थेट विमानसेवा (direct flight) असेल. या एअरलाईन कंपनीचा असा विश्वास आहे की, या सेवेमुळे प्रवासी आणि मालवाहतूक (cargo) क्षमतेत लक्षणीय भर पडेल. तसेच VFR (व्हिजिटिंग फ्रेंड्स अँड रिलेटिव्हज) आणि भारत आणि कुवेत दरम्यानच्या व्यावसायिक प्रवासाची मागणी पूर्ण होईल.

अकासा एअर सध्या 22 देशातील शहरांव्यतिरिक्त चार परदेशातील शहरात उड्डाण करते यात दोहा (कतार), जेद्दाह, रियाध (सौदी अरेबिया) आणि अबू धाबी (यूएई) यांचा समावेश आहे.

अकासा एअरबद्दल थोडक्यात जाणून घेऊया

अकासा एअरलाईन ही एसएनव्ही एव्हीएशन प्रायव्हेट लिमिटेडचा ब्रँड आहे. ही एक भारतीय स्वस्तातील एअरलाइन आहे ज्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे आहे. त्याची स्थापना विनय दुबे आणि आदित्य घोष यांनी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्यासोबत एअरलाइनमध्ये 46% भागीदारी करून केली होती. अकासा एअरने 7 ऑगस्ट 2022 पासून उड्डाण करण्यास सुरुवात केली.



हेही वाचा

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात ऑगस्टमध्ये बदल होणार

मुंबईत लवकरच रेल्वेचा चेहरा मोहरा बदलणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा