बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST)च्या परवान्याअंतर्गत एसी बस सेवा चालवणाऱ्या 'चलो' अॅपच्या प्रवासी संख्येत गेल्या 3 महिन्यांत 50% वाढ झाली आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, चलो आपल्या ताफ्यात 44% ने लक्षणीय वाढ करत आहे. नवीन इलेक्ट्रिक एसी बसेस ताब्यात आल्याने बसेसची एकूण संख्या 144 होणार आहे.
याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. तसेच यामुळे बेलापूर-कुलाबा (MTHL-अटल सेतू मार्गे) सारख्या लोकप्रिय मार्गांवर अधिक ट्रिप होतील. तसेच ठाणे-अंधेरी, ठाणे-BKC, आणि नवी मुंबई-BKC या मार्गांवर देखील प्रवासी संख्या 15% ते 40% पर्यंत वाढली आहे.
बेलापूर-कुलाबा मार्गावरून अनेक बसेस MTHL मार्गाने जातात. तसेच नवी मुंबई ते कुलाबा मार्गावरून देखील अनेक बसेस नवीन MTHL-अटल सेतू आणि इस्टर्न फ्रीवेद्वारे जातात. या दोन्ही बसेसना चांगली मागणी आहे. म्हणून Chalo ने या मार्गांवर 50% अधिक फेऱ्या वाढवल्या आहेत. या बसेसच्या विस्तारासह, Chalo नवीन मार्गांवर या बसेस सुरू करण्याची शक्यता आहे. जेणेकरून संपूर्ण मुंबईतील पर्यटकांसाठी सोयीचे ठरेल.
"मुंबईतील चलो बसची वाढती मागणी पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत," असे चलोचे सीईओ मोहित दुबे म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, "नवीन प्रवास योजना आणि ताफ्याच्या विस्तारासह, चलो दिवसभर आणि आठवड्याच्या शेवटी नवीन मार्ग जोडणार आहे. संपूर्ण मुंबईत परवडणाऱ्या अशा सार्वजनिक वाहतूक सेवेचा अनुभव देणार आहे."
Chalo च्या मासिक प्रवास योजना देखील प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहेत. कारण यामध्ये 10 ते 45 फेऱ्यांचा पर्याय उपलब्ध आहे, जो की प्रवाशांसाठी सोईस्कर आहे. Chalo ने प्रवाशांच्या मागणीवर विशिष्ट मार्गावर पासेसची देखील सोय केली आहे, याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
हेही वाचा