मागील अनेक वर्ष आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्टच्या वाट्याला आद्याप चांगले दिवस आल्याचं पाहायला मिळत नाही. सतत उत्पनात घट, कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर न होणं, प्रवासी संख्या कमी, अपुऱ्या सुविधा यासारख्या अनेक कारणांमुळं बेस्ट उपक्रम सतत चर्चेत राहिला आहे. दरम्यान बेस्ट आर्थिक तोटा होण्याची कारण समोर आलं आहे. बेस्टच्या २२५० कोटी रुपयांच्या तोट्याला वाहतूक कोंडी, नादुरुस्त रस्ते आणि कर्मचाऱ्यांची गैरहजरी या गोष्टी जबाबदार ठरल्याची कबुली बेस्ट प्रशासनानं दिली आहे.
मुंबईतील मेट्रोची कामं, त्यामुळं बसला निश्चितस्थळी पोहोचण्यासाठी होणारा विलंब, परिणामी प्रवाशांचं बेस्ट बस सेवा सोडून इतर वाहन सेवेकडं वळणं आणि बसचालक-वाहक यांची कमतरता इत्यादी कारणंही बेस्टच्या तोट्याला कारणीभूत असून, निश्चित लक्ष्य गाठण्यात बेस्ट प्रशासनाला अडचणी येत आहेत.
बेस्टचा तोटा कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. तसंच, बेस्ट प्रशासन विविध उपाययोजना करून बेस्टचा तोटा कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावाही त्यांनी केला. नोव्हेंबर महिन्यात ३३३२ बसचा ताफा सांभाळत १ कोटी ७० लाख ५७ हजार ५७७ किलोमीटरपर्यंत प्रवासी टप्पा गाठण्याचं लक्ष्य बेस्टनं ठेवलं होतं. मात्र, ३२ बस डेपोमधील बसना चालक, वाहक, कर्मचारी, अभियंत्यांची कमतरता तसंच गैरहजेरी यासह अन्य कारणांमुळं हे लक्ष्य गाठण्यात अपयश आलं आहे.
हेही वाचा -
'डेक्कन क्विन'चा प्रवास होणार आणखी जलद