Advertisement

बेस्टच्या ताफ्यात १० इलेक्ट्रीक बस दाखल

इलेक्ट्रिक बसमधील १० बस बेस्टच्या धारावी आगारात गुरुवारी दाखल झाल्या आहेत.

बेस्टच्या ताफ्यात १० इलेक्ट्रीक बस दाखल
SHARES

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ होत असल्यानं बसगाड्यंचा ताफाही वाढविण्याच्या निर्णय बेस्टनं घेतला आहे. बेस्टनं भाडेतत्वावर ४०० वातानुकूलित बसगाड्या घेण्याची प्रक्रिया सुरू केली. तसंच, आणखी १२५० मिडी, मिनी व इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्यात येणार आहेत. या इलेक्ट्रिक बसमधील १० बस बेस्टच्या धारावी आगारात गुरुवारी दाखल झाल्या आहेत.

३ हजार बसगाड्या

पर्यावरणाला पोषक इलेक्ट्रिक बसगाड्याही घेण्यात येत आहेत. यापैकी १० बसगाड्या दाखल झाल्या आहेत. प्रादेशिक वाहतूक कार्यालयाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर या बसगाड्या रस्त्यांवरून धावणार असल्याचं बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यानबेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३ हजार २०० बसगाड्या आहेत. तर आणखी ३ हजार बसगाड्या वाढविण्यात येणार आहेत. भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या या बसगाड्यांमध्ये वातानुकूलित बसची संख्या अधिक असणार आहे.

बेस्ट उपक्रमाचा चालक

या बसवर खासगी चालक आणि बेस्टचा वाहक असणार आहे. मात्र, या बसवर खासगी चालक न ठेवता बेस्ट उपक्रमाचाच चालक नेमावा अशी मागणी बेस्ट कामगार सेनेनं गुरुवारी वेतन कराराबातत झालेल्या बैठकीत केली. तसंच, शारीरिकदृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा भरती, नैमत्तिक सेवेत कायम करावे, प्रवेश श्रेणीवरील रिक्त जागा भराव्यात यांसारख्या आदी मागण्या बेस्ट कामगार सेनेनं केल्या.



हेही वाचा -

यंदा गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा