मुंबईतील महत्वाच्या मार्गांवर आणि गल्लोगल्ली बेस्टची बस धावत आहे. परंतु, या मार्गावर धावणाऱ्या अंदाजीत १० बसपैकी २ ते ३ बस पूर्ण भरून धावतात. उर्वरित बसमध्ये प्रवाशांची संख्या कमी असते. तसंच, इंधनाच्या खर्चात वाढ होते. इंधनाच्या खर्चात वाढ झाल्यानं या मार्गावर बेस्टला मोठ्या प्रामाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यामुळं बेस्टच्या प्रवासी संख्येतही प्रचंड घट झाली. त्यामुळं ही घट भरून काढण्यासाठी बेस्टनं बेस्टच्या तिकीट दरात कपात केली. साध्य बसचं किमान तिकीट दर ५ रुपये आणि एसी बसचं दर ६ रुपये केलं. प्रवाशांच्या दृष्टीनं हा निर्णय घेत, त्याचसोबत बेस्टनं आपल्या ताफ्यातील बेस्टचा ताफा वाढविण्याचाही निर्णय घेतला. त्यानुसार, बेस्टच्या ताफ्यात ४०० मिडी, मिनी एसी बस दाखल होणार आहेत. सध्यस्थितीत बेस्टच्या ताफ्यात ६ मिनी एसी बस दाखल झाल्या आहेत.
बेस्टच्या या नव्या मिनी एसी बस मुंबईतील रस्त्यावर मार्गस्थ झाल्या आहेत. दाखल झालेल्या ६ मिनी एसी बसमधील २ बस दादर पश्चिम येथील महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डमधील सार्वजनिक वाहनतळापासून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालविण्यात येत आहे. त्यानुसार ए-५४ आणि ए-५५ हे नवीन वातानुकुलित बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरित बस या बेस्टच्या १२२ या जुन्या बसमार्गावर चालविण्यात येत आहेत. ए-५४ ही पहिली बस सकाळी ८.१५ वाजता सुटत असून, शेवटची बस १० वाजता सुटत आहे. तसंच, ए-५५ ही पहिली बस सकाळी ८ वाजता सुटत असून, शेवटची बस १०.१५ वाजता सुटत आहे.
महात्मा गांधी जयंती दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरला या बस मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्या. पहिल्याच दिवाशी या मिनी बसला प्रवाशांचा चांगाला प्रतिसाद मिळाल्याची माहिती बेस्टनं दिली. या बसमार्गांचे प्रवर्तन घटीवत व प्रतिघटीवत वर्तुळाकार सेवेत कार्यान्वित करण्यात आली आहे. बेस्टची मिनी बस ही आकारानं लहान असल्यानं बसच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसनं प्रवास करत आहेत.
बसमार्ग क्र. ए-५४
बसमार्ग क्र. ए-५५
कोहिनूर पी. पी. एल. मार्ग-२ - जे. के. सावंत मार्ग - न. चिं केळकर मार्ग - वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) - न. चिं. केळकर मार्ग - एस के. मार्ग - श्री सिद्धिविनायक मंदिर - वीर सावरकर मार्ग - वसंत देसाई चौक - केळुसकर मार्ग (दक्षिण) - मीनाताई ठाकरे स्मारक - केळुसकर मार्ग - राम गणेश गडकरी चौक - लेडी जमशेटजी मार्ग - बाई पदमाबाई ठक्कर मार्ग - कोहिनूर पी. पी. एल -१ - बाई पदमाबाई ठक्कर मार्ग.