Advertisement

बेस्ट उपक्रमात दाखल होणार ८० इलेक्ट्रिकल मिडी बस

बेस्टने उपक्रमातून एसी बस बंद केल्या होत्या. मात्र, प्रवाशांच्या सेवेत एसी बस पुन्हा दाखल करण्यात याव्यात अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यामुळं बेस्ट प्रशासनाने एसी बस आणण्यासाठी प्रस्ताव आखला आहे.

बेस्ट उपक्रमात दाखल होणार ८० इलेक्ट्रिकल मिडी बस
SHARES

बेस्टच्या प्रवाशांसाठी बेस्ट प्रशासनानं खूशखबर दिली आहे. कारण आता बेस्ट उपक्रमात ८० इलेक्ट्रिकल मिडी बस दाखल होणार अाहेत. या ८० इलेक्ट्रिकल मिडी बस गाड्यांपैकी ४० बस या एसी असून यामध्ये बेस्ट आणि खासगी अशा दोन्ही कंपन्यांचा सहभाग असणार आहे. सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.


९ मीटरच्या बस 

बेस्टने उपक्रमातून एसी बस बंद केल्या होत्या. मात्र, प्रवाशांच्या सेवेत एसी बस पुन्हा दाखल करण्यात याव्यात अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यामुळं बेस्ट प्रशासनाने एसी बस आणण्यासाठी प्रस्ताव आखला आहे. सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रस्तावानुसार बेस्टने ९ मीटर लांबीच्या ८० बस घेण्याचा निर्णय घेतला अाहे.  

१ कोटी २२ लाख खर्च 

एसी बससह साध्या मिडी बससाठी प्रत्येकी १ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात येणार अाहेत.  बेस्ट उपक्रमात दाखल होणाऱ्या बसच्या देखभालीची जबाबदारी बेस्ट आणि खासगी कंपनीची असणार आहे. त्यातील ६० टक्के वाट बेस्टचा तर ४० टक्के वाटा खासगी कंपनीचा असणार आहे.



हेही वाचा - 

'बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देणार, पण तारीख नाही सांगणार'

मध्य रेल्वे चालवणार ५० हिवाळी विशेष एक्स्प्रेस




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा