देशातील पहिल्या मुंबई (mumbai)- अहमदाबाद बुलेट ट्रेन (BULLET TRAIN) प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. गुजरातमध्ये या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र आता महाराष्ट्र (maharashtra) राज्यातही या प्रकल्पांच्या कामाला वेग आला आहे.
या प्रकल्पाच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC) भूमिगत स्थानकाच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिला बेस स्लॅब टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हा स्लॅब 32 मीटर खोलीवर ठेवला आहे आणि हा 10 मजली इमारतीला समांतर इतक्या उंचीचा आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम हाती घेतले आहे. बुलेट ट्रेनची लांबी 508 किमी असून या मार्गावर भूमिगत बांधण्यात येणारे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हे एकमेव स्थानक आहे.
या स्थानकाचा पहिला काँक्रीट बेस स्लॅब 30 नोव्हेंबर रोजी टाकण्यात आला आहे. हा स्लॅब जमिनीपासून सुमारे 32 मीटर खोलीवर ठेवण्यात आला आहे.
बुलेट ट्रेनच्या मार्गावर ग्राउंड फाउंडेशनपासून ते काँक्रिटीकरणापर्यंतचे काम सुरू झाले आहे. यातील आठ स्थानके गुजरातमध्ये आहेत तर चार स्थानके महाराष्ट्रात बांधली जाणार आहेत.
यामध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांचा समावेश आहे.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशन हे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्टेशन आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मध्यभागी हे 32 मीटर खोल स्टेशन बांधण्यासाठी सुमारे 18.7 लाख घनमीटरपर्यंत उत्खनन केले जाईल. त्यापैकी 52 टक्के उत्खनन झाले आहे.
प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे.
हेही वाचा