Advertisement

मध्य रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी विशेष तिकिट तपासक पथकाची मागणी

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत-कसारा मार्गांवर गर्दीच्या वेळेत महिलांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रथम श्रेणीच्या महिला प्रवाशांना डब्यात बसण्यास आणि उभं राहण्यास जागा मिळत नाही.

मध्य रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी विशेष तिकिट तपासक पथकाची मागणी
SHARES

लोकलमधून विनातिकीट प्रवास केल्यास प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र, मध्य रेल्वे मार्गावरील लोकलमधील महिलांच्या प्रथम श्रेणी डब्यांमधून द्वितीय श्रेणीचे तिकिट असलेल्या महिला प्रवास करत असल्याचे उघडकीस आलं आहे. गर्दीचा फायदा घेत द्वितीय श्रेणीतील महिला प्रवासी दररोज प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करतात. यामुळे प्रथम श्रेणीच्या महिला प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याप्रकरणी वारंवार तक्रार करूनही रेल्वे पोलिस लक्ष देत नाहीत. यासाठी प्रथम श्रेणी डब्यांमध्ये तिकीट तपासकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी केली आहे.


विनातिकीट प्रवास

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत-कसारा मार्गांवर गर्दीच्या वेळेत महिलांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रथम श्रेणीच्या महिला प्रवाशांना डब्यात बसण्यास आणि उभं राहण्यास जागा मिळत नाही. अशावेळी जीव धोक्यात घालून लोकलच्या दरवाज्याच्या शेजारी उभं राहून प्रवास करावा लागतो. दरम्यान, याप्रकरणी रेल्वे प्रशासनाला महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघटनेकडून निवेदन देण्यात आलं आहे. मात्र, तरीही रेल्वे पोलिस कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही, असा आरोप वंदना सोनावणे यांनी केला आहे.


प्रमुख मागण्या

प्रथम श्रेणीच्या डब्यातून गर्दूल्ले, भिकारी, तृतीयपंती दररोज प्रवास करत असल्यामुळे या डब्यामध्ये विशेष तिकीट तपासक पथकांची नेमणूक करण्यात यावी, आर.पी. एफ आणि जी.आर.पी यांची नेमणूक करण्यात यावी, लोकलच्या जनरल डब्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरीता राखीव जागा ठेवण्यात यावी, पिकअवरमध्ये प्रथम श्रेणी डब्याच्या दरवाजावर उभं राहणाऱ्या महिला प्रवाशांवर कारवाई करण्यत यावी, या प्रमुख मागण्या रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा 

रेल्वे स्थानकांवर नवीन एलईडी इंडिकेटर्स


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा