Advertisement

लोकल बंद असल्यानं 'बेस्ट'च्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ

बेस्टची प्रवासी संख्या वाढली असून, लॉकडाऊन काळात अडीच लाखांवर पोहोचलेली बेस्ट प्रवाशांची दररोजची संख्या आता २३ लाखांहून अधिक आहे.

लोकल बंद असल्यानं 'बेस्ट'च्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ
SHARES

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद ठेवण्यात आला. त्यामुळं प्रवाशांना सार्वजनिक व खाजगी रस्ते वाहतुकीनं प्रवास करावा लागत होता. दरम्यान, याकाळात लोकल प्रवास बंद असल्यानं अनेकांनी मुंबईची दुसरी लाइफलाइन बेस्ट बसला प्राधान्य दिलं. परिणामी बेस्टची प्रवासी संख्या वाढली असून, लॉकडाऊन काळात अडीच लाखांवर पोहोचलेली बेस्ट प्रवाशांची दररोजची संख्या आता २३ लाखांहून अधिक आहे.

स्वस्त आणि सुरक्षित 'बेस्ट' प्रवासालाच मुंबईकरांनी प्राधान्य दिलं आहे. लॉकडाऊन काळात अडीच लाखांवर पोहोचलेली बेस्ट प्रवाशांची दररोजची संख्या आता २३ लाखांहून अधिक आहे. त्यामुळं बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत दीड वर्षानंतर आता दररोज सरासरी २ कोटी रुपये उत्पन्न जमा होऊ लागले आहे.

२०१९ मध्ये महापालिका प्रशासनानं आखून दिलेल्या कृती आराखड्यानुसार बेस्ट उपक्रमाच्या बसभाड्यात जुलै महिन्यापासून मोठी कपात करण्यात आली. किमान भाडे ५ ते कमाल २० रुपये एवढे असल्यानं दररोजची प्रवासी संख्या ३४ लाखांवर पोहोचली होती. मात्र, परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं वाटत असताना मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आल्यानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच तेवढे बेस्ट बसमधून प्रवास करीत होते.

वाढलेली प्रवासी संख्या

तारीख
प्रवासी
उत्पन्न
बसगाड्या 
२६ जुलै
२३ लाख १४ हजार
१,९१,७८,०००
३१६१
२७ जुलै
२२ लाख ८२ हजार
१,८५,४८,०००
३१६५
२८ जुलै
२२ लाख ८० हजार
१,८२,७९,०००
३१६०
२९ जुलै
२२ लाख ९८ हजार
१,८५,६९,०००
३१६८
३० जुलै
२३ लाख आठ हजार
१,८५,३८,०००
३१६९
२ ऑगस्ट
२३ लाख ६३ हजार
२,००,२६,०००
३१६२
३ ऑगस्ट
२३ लाख ३६ हजार
१,९३,७५,०००
३१६३




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा