Advertisement

लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वे ठरतेय जीवनवाहिनी

मध्य रेल्वे वेळोवेळी आपल्या पार्सल गाड्यांसह देशभरात सातत्यानं जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करत आहे.

लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वे ठरतेय जीवनवाहिनी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळं वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, या लॉकडाऊन व अनलॉकच्या काळात मध्य रेल्वे जीवनवाहिनी ठरत आहे. मध्य रेल्वे वेळोवेळी आपल्या पार्सल गाड्यांसह देशभरात सातत्यानं जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. रेल्वेच्या मुंबई विभागानं एप्रिल ते २९ ऑगस्ट या कालावधीत ३५६ सेवांसह ११ हजार ४०० टन जीवनावश्‍यक वस्तूंची मालवाहतूक केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई व कल्याण येथून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या पार्सल गाड्यांमधून हजरत निजामुद्दीन, शालीमार, हावडा, सिकंदराबाद, चेन्नई, वाडी, नागपूर अशा अनेक ठिकाणी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, मशिनरीचे भाग, छापील साहित्य आणि टपाल बॅग अशा अंदाजे ८ हजार ८९०० टन जड पार्सलची वाहतूक केली आहे.

या काळात नाशवंत वस्तू व औषधांची वाहतूक करणे एक आव्हानात्मक काम होते. मात्र मध्य रेल्वेने देशाच्या विविध भागात १ हजार १० टन खाद्यपदार्थ, पेरीशेबल्स, ८१७ टन औषधे, आणि ६७३ टन रुग्णालयीन वस्तू, वैद्यकीय व शल्य चिकित्सा उपकरणांची वाहतकू केली आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.



हेही वाचा -

टिळक ब्रीजवरील खड्डा ठरतोय धोकादायक

बाप्पाच्या विसर्जनासाठी यंदा ४४५ विसर्जनस्थळं सज्ज


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा