Advertisement

कर्मचाऱ्यांसाठी धावणार एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस

कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी एसटीनं अतिरिक्त २५० बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे

कर्मचाऱ्यांसाठी धावणार एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस
SHARES

सोमवारपासून मंत्रालय व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळं या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी एसटीनं अतिरिक्त २५० बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे. या बसेस मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजे ,पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून धावणार असून, पैकी १४२ बसेस विशेषतः मंत्रालय, १५ बसेस महापालिका भवन मार्गावर धावणार आहेत. उर्वरित (सुमारे१००) बसेस मुंबई महानगर प्रदेशातंर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. 

या सर्व बसेस योग्य रीतीने सॅनिटाराईज करण्यात आलेल्या असुन, प्रवासात सोशल डिस्टंनसिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यात येणार आहे. २३ मार्च पासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी या सर्वांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल ४०० बसेसद्वारे दररोज ८०० पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात.

हेही वाचा - एसटीच्या सुमारे २४५१ चालक, वाहकांची गैरहजेरी

सध्यस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४०० बसेस धावत आहेत. दररोज सुमारे १४-१५ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण एसटीच्या बसेसद्वारे केली जाते. गरज भासल्यास आणखीन जादा बसेस एसटी कडून सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली आहे.

हेही वाचा - एसटीने केली ५ लाखांहून अधिक स्थलांतरीत मजुरांची रवानगी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं कंपन्या आणइ उद्योगधंदे बंद आहेत. परिणामी अनेक नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. परंतु, या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार कामासाठी हे कर्मचारी घराबाहेर पडत असून त्यांच्या वाहतूकसेवेसाठी गेले २ महिने एसटी महामंडळ सेवा देत आहे. ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असल्यानं त्यामधून सामान्यांना प्रवासाची सुविधा नव्हती. परंतु, राज्यात अनलॉक १.० सुरू झाल्यापासून अनेक सुविधांवरील बंधन उठवली जात आहेत.



हेही वाचा -

परीक्षा रद्द करणं अशक्य, CBSE-CISCE बोर्डाने मांडली सरकारपुढं स्पष्ट भूमिका

गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णांनाच मिळावा हाॅस्पिटल बेड- महापौर



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा