Advertisement

लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद


लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
SHARES

लॉकडाऊनमुळम मागील २ महिने बंद असलेली लोकल पुन्हा रुळावर आहे. सोमवारी लोकल सुरू होताच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लोकल सुरू होताच तुफान प्रतिसाद दिला. त्यानंतर मंगळवारपासून या सेवेला प्रतिसाद आणखी वाढला. प्रवासी संख्येत वाढ झाल्यानं सकाळी व संध्याकाळी ५ वाजताच्यानंतर लोकल गाड्यांना गर्दी झाली. सोमवारी मध्य व पश्चिम रेल्वेवर एकूण ३५ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला होता. तर मंगळवारी त्यात आणखी वाढ होऊन प्रवासी संख्या ६० हजारपेक्षा जास्त झाली.

दररोज सव्वा लाख अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची लोकलनं वाहतुक करण्याची मंजुरी रेल्वेला मिळाली आहे. दरम्यान, सध्या रेल्वे मार्गावर धावत असलेल्या १२ डबा लोकलमधील आसनावर १,२०० प्रवासी बसण्याची क्षमता आहे. मात्र अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या लोकल प्रवासात एका लोकलमध्ये ७०० प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

काही नियम अटी रेल्वे प्रशासनानं लोकल सुरू होण्यापूर्वीच प्रवाशांच्या पुढे ठेवल्या होत्या. परंतु, मंगळवारपासून वाढलेल्या प्रवासी संख्येमुळं सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन होत नाही. सकाळी व संध्याकाळी ५ वाजताच्यानंतर लोकल गाड्यांमध्येही गर्दीचं चित्र पाहायला मिळत आहे. रेल्वेनं एका लोकलमधील प्रवासी क्षमता सांगूनही त्यातून जास्तच प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळं लोकलच्या प्रत्येक डब्यातील एका आसनावर ३ प्रवासी व उभ्यानंही प्रवासी प्रवास करत होते.

Advertisement

मध्य रेल्वेकडून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी २०० लोकल फेऱ्या, तर पश्चिम रेल्वेकडून १६२ लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. मध्य रेल्वेवर कल्याण, डोंबिवली, बदलापूर, ठाणे, कुर्ला, दादर या स्थानकातून, तर अंधेरी, बोरीवली, विरार, बोईसर, नालासोपारा या स्थानकातून सर्वाधिक तिकीट व पास काढण्यात आले.



हेही वाचा -

मुंबईतील 'या' वॉर्डांमधील कोरोना रूग्णांची संख्या अनेक राज्यांपेक्षा अधिक

पावसात अडकल्यास मुंबई पालिकेचं 'हे' अ‍ॅप ठरणार संकटमोचक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा