नववर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे (central railway) मुंबई- नागपूर (nagpur) आणि मुंबई (mumbai)- करमाळी (karmali) दरम्यान विशेष गाड्या धावणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहे:
1) लोकमान्य टिळक टर्मिनस -नागपूर साप्ताहिक विशेष
02139 साप्ताहिक विशेष 21.12.2024 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 00.55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.30 वाजता नागपूरला पोहोचेल.
02140 साप्ताहिक स्पेशल नागपूर येथून 21.12.2024 रोजी 22.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
डब्ब्यांची रचना: एक AC1- टायर कम AC-2 टियर, दोन AC-2 टियर, 9 AC-3 टियर, 2 स्लीपर क्लास, 2 जनरल सेकंड क्लास/चेअर कार, 1 लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.
2) LTT-करमाळी-LTT दैनिक विशेष
01149 स्पेशल 23.12.2024 ते 31.12.2024 पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईहून दररोज दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 05.30 वाजता करमाळीला पोहोचेल.
01150 स्पेशल 24.12.2024 ते 01.01.2025 पर्यंत करमाळीहून दररोज सकाळी 06.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 22.15 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम
रचना: एक AC1- टायर कम AC-2 टियर, तीन AC-2 टियर, 12 AC-3 टियर, 2 स्लीपर क्लास, 2 जनरल सेकंड क्लास/चेअर कार, 1 लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.
हेही वाचा