पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डहाणू-पनवेल मेमू सोमवारपासून पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला होता.
बोईसर-दिवा मेमू सेवा सुरू केली असून, आता डहाणू-पनवेल मेमू सेवा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. येत्या सोमवारपासून ही गाडी सकाळी ५.२५ वाजता डहाणू येथून सुटून ८.५५ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासाला पनवेलवरून सायंकाळी ७.५ वाजता सुटणारी मेमू रात्री १०.३० वाजता डहाणू येथे पोहोचेल. मेमूप्रमाणे शटल पॅसेंजर सेवा सुरू कराव्यात. तसेच एक्स्प्रेस गाड्यांना सफाळे, पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू येथे थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन अनेक कालावधीपासून बंद असलेल्या डहाण-पनवेल, वसई-पनवेल मेमू आजपासून सुरु होत आहेत. या गाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.