Advertisement

विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी 1’ प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा निर्णय

देखभालीच्या कामासाठी विद्यानगर मेट्रो स्थानकावरील ‘बी 1’ प्रवेशद्वार मंगळवार, 1 एप्रिल रोजी सकाळपासून बंद करण्यात आले.

विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी 1’ प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा निर्णय
SHARES

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो 3’ (metro 3) मार्गिकेतील आरे – बीकेसी (bkc) टप्प्यातील विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी 1’ प्रवेशद्वार तांत्रिक कारणासाठी मंगळवारपासून मुंबई (mumbai) मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (mmrc) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

1 ते 7 एप्रिलपर्यंत हे प्रवेशद्वार बंद राहणार आहे. 8 एप्रिलपासून हे प्रवेशद्वार पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. या कालावधीदरम्यान पर्यायी प्रवेशद्वाराचा वापर करण्याचे आवाहन एमएमआरसीकडून करण्यात आले आहे.

एमएमआरसीकडून 33.5 किमी लांबीच्या ‘मेट्रो 3’ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर 2024 पासून सेवेत दाखल झाला. ही मार्गिका खुली होऊन काही महिने होत नाही तोच एमएमआरसीने देखभालीची कामे हाती घेतली आहेत.

देखभालीच्या कामासाठी विद्यानगर मेट्रो स्थानकावरील ‘बी 1’ प्रवेशद्वार मंगळवार, 1 एप्रिल रोजी सकाळपासून बंद (closed) करण्यात आले.

एमएमआरसीने ‘एक्स’ समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार विद्यानगरी मेट्रो स्थानकावरील ‘बी 1’ प्रवेशद्वार 1 ते 7 एप्रिल या कालावधीत बंद राहणार आहे. काही तांत्रिक कारणांसाठी प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे.

या कालावधीत प्रवाशांनी पर्यायी प्रवेशद्वाराचा वापर करावा, असे आवाहनही एमएमआरसीने एका जाहीर निवेदनाद्वारे केले आहे. त्यामुळे आठवडाभर ‘बी 1’ प्रवेशद्वार बंद असणार असून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यांना पर्यायी प्रवेशद्वाराचा वापर करावा लागणार आहे.

तांत्रिक कारणांसाठी प्रवेशद्वार बंद करण्यात येत असल्याचे एमएमआरडीएकडून (mmrda) सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देखभालीच्या कामासाठी प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे.

देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर 8 एप्रिलपासून ‘बी 1’ प्रवेशद्वार प्रवाशांसाठी खुले होईल असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आरे – बीकेसी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होऊन काही दिवस होत नाही तोच एमएमआरसीने प्रवेशद्वार बंद केले आहे.

तसेच सेवा वेळेत कपात करण्यात येत असल्याचे म्हणत प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा