मुंबई - हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. चेंबूरजवळील रेल्वे क्रॉसिंग पॉइंटमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारी सकाळी 8 ते साडेनऊपर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यामुळे चाकरमान्यांना मनस्तापाला सामोरं जावे लागले. मात्र दीड तासानंतर बिघाड दुरुस्त झाला तरी वाहतूक पूर्वपदावर आली नव्हती.
याबात प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांना विचारले असता "मेगाब्लॉकचा ताप प्रवासी रविवारपुरता सहन करतात. तरीही कपलिंग तुटण्यासारख्या घटना घडत असतील तर मॅगाब्लॉकच्या नावाने प्रवाशांना ठेंगा का दाखवला जातो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तर रेल्वे मार्गाचा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. त्यामुळे रेल्वे 10 मिनिटे उशिरा आली, तरी रेल्वे फलाटावर आणि गाडीत मोठ्या प्रामाणात गर्दी होते. सकाळी चेंबूरला जी घटना घडली त्यामुळे प्रवाशांना दीड तास खोळंबून राहावे लागले. तसेच दर रविवारी ब्लॉक घेतला जातो. पण त्यात काय काम केले जाते? मग अशा घटना वारंवार का घडतात? असा प्रश्न रेल्वे यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी उपस्थित केला.