Advertisement

नव्या वर्षात रेल्वे प्रवास महागणार?

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

नव्या वर्षात रेल्वे प्रवास महागणार?
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच रेल्वे प्रवासासाठी तिकीटाकरीता जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात रेल्वे प्रवास २० टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता आहे. याबाबत रेल्वे प्रशासनानं दरवाढीचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, रेल्वेच्या सर्व श्रेणीतील प्रवास महागणार असल्याचं म्हटलं जात आहे. रेल्वेच्या तिकीट दरांत वाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

आर्थिक तूट

रेल्वे प्रवास ५ पैसे प्रती किलोमीटर ते ४० पैसे किलोमीटरपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच रेल्वे प्रवास १० ते २० टक्के वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संसदीय समितीच्या शिफारशी आणि आर्थिक तूट भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

नवीन दरांचा आराखडा

संसदीय समितीच्या शिफारशीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून याला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे बोर्डानं नवीन दरांचा आराखडा तयार केला आहे. रेल्वेकडून हे दर वाढवल्यानंतर रेल्वेच्या खात्यात प्रति वर्ष ४ हजार कोटी रुपये ते ५ हजार कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

‘सेट’ परीक्षा होणार २८ जूनला

हिंमत असेल तर अटक करून दाखवा- प्रकाश आंबेडकर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा