Advertisement

रुळाला तडे गेल्याने हार्बरची वाहतूक कोलमडली


रुळाला तडे गेल्याने हार्बरची वाहतूक कोलमडली
SHARES

हार्बर रेल्वे मार्गावार मानखुर्द आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान वाशी खाडी पुलावरील रुळाला तडे रुळाला तडे गेल्यानं मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक 8.30 पासून पूर्णपणे ठप्प झाली होती. एेन कामाला जायच्यावेळी वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.

या घटनेनंतर गेल्या तासाभरापासून अप मार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांना ठाणेमार्गे जाण्याची परवानगी दिल्याने वाशीला गर्दी कमी झाली. रेल्वे प्रशासनानं तातडीने रुळांच्या दुरस्तीचं काम हाती घेतलं असून, काम पूर्ण झाले असले तरी गाड्या 30 मिनिटं उशिराने धावत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा