Advertisement

लोकल प्रवासासाठी पत्रकारांची न्यायालयात धाव

कोरोना संकट काळात पत्रकारांनाही अनेक आव्हानांचा सामना करत आपले कर्तव्य बजावावे लागत आहे.

लोकल प्रवासासाठी पत्रकारांची न्यायालयात धाव
SHARES

कोरोना संकट काळात पत्रकारांनाही अनेक आव्हानांचा सामना करत आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. अशावेळी मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व पत्रकारांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे पत्रकारांनाही लोकल प्रवास खुला करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशा विनंतीची जनहित याचिका 'मुंबई मराठी पत्रकार संघ' या पत्रकारांच्या संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

'प्रसारमाध्यमांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा आणि मुंबई लोकलद्वारे पत्रकारांना प्रवासाची परवानगी मिळावी याकरिता पत्रकार संघ २२ डिसेंबर २०२०पासून सातत्याने प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. ३० जून २०२१ रोजीही निवेदन देण्यात आले. पत्रकारांच्या न्याय्य मागण्याचा मान्य न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही ७ जुलै २०२१च्या पत्राद्वारे राज्य सरकारला देण्यात आला.

तरीही राज्य सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने नाईलाजास्तव उच्च न्यायालयात दाद मागावी लागत आहे', असे म्हणणे पत्रकार संघाने अॅड. नीलेश पावसकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत मांडले आहे. ही याचिका लवकरच सुनावणीस येण्याची अपेक्षा असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी म्हटलं.



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा