Advertisement

स्वदेशी बनावटीच्या १० मोनो रेल लवकरच होणार दाखल

मोनो रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच स्वदेशी बनावटीच्या १० गाड्या दाखल होणार आहे.

स्वदेशी बनावटीच्या १० मोनो रेल लवकरच होणार दाखल
SHARES

मोनो रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच स्वदेशी बनावटीच्या १० गाड्या दाखल होणार आहे. त्यामुळं २ मोनो रेलमधील अंतर कमी होणार असून, प्रवाशांना स्थानकांत २० ते २५ मिनिटे तात्काळत उभे राहण्याची गरज भासणार नाही. दरम्यान, अडगळीत पडलेल्या मोनोरेलकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) १० मोनोगाड्या बांधणीचा मार्ग आता खुला झाला आहे. मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल होणार आहे.

मोनोरेलसाठी सध्या प्रवाशांना साधारणपणे २५ ते ३० मिनिटे वाट पाहावी लागते. गाड्या उपलब्ध नसल्याने फेऱ्या वाढवण्यास प्रचंड मर्यादा आहेत. आता स्वदेशी बनावटीच्या दहा गाड्या दाखल झाल्यानंतर एकूण १७ गाड्यांच्या माध्यमातून प्रति ४ ते ६ मिनिटाला एक फेरी उपलब्ध होणार आहे.

गाडी बांधणीबाबत 'निविदा मूल्यमापन प्रक्रियेविरोधात' टिटाग्राफ कंपनीनं दाखल केलेल्या याचिकेवर संबंधित कंपनीला दिलासा देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यामुळं एमएमआरडीएला मोनोरेल गाडी बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मुभा कायम राहिली आहे.

मेधा कंपनीला १० मोनोरेल गाड्या बांधण्यासाठी ५८९ कोटी ९५ लाखांचे कंत्राट देण्यात आले असून, मुंबई मोनोरेल प्रकल्पासाठी डिझाइन आणि तांत्रिक बाबींकरिता सल्लागार नियुक्तीसाठी खुल्या स्वरूपात निविदादेखील मागवल्याची माहिती मिळते.

मुंबईतील संत गाडगे महाराज चौक-वडाळा-चेंबूर दरम्यान १९.५४ किलोमीटर मार्गावर मोनोरेल धावत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असा हा प्रकल्प मानला जातो. मोनोरेल टिकवण्यासाठी भविष्यात या मार्गाला मेट्रो मार्ग जोडण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा