अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. त्यामुळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळानं सोमवार २१ सप्टेंबरपासून गर्दीच्या वेळेत विशेष एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.
शासकीय सेवेतील महिलांबरोबरच खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी बस चालवण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं. पनवेल, डोंबिवली, विरार येथून मंत्रालयापर्यंत या एसटी बस सोडण्यात येतील. प्रत्येक ठिकाणाहून सकाळी एक एसटी बस सुटेल. मंत्रालय येथून सायंकाळी याच मार्गावर एसटी बस सोडण्यात येणार आहे.
प्रायोगिक तत्वावर या बस चालवण्यात येतील. त्यानंतर हळूहळू त्यांच्या वाढवण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
एसटी बससेवा
(मंत्रालय येथून डोंबिवली आणि विरारसाठी सायंकाळी ५.३५ वाजता आणि पनवेलसाठी ५.४५ वाजता प्रत्येकी एक फेरी होईल.)