पश्चिम रेल्वेने (western railway) ट्रेन क्रमांक 22961 मुंबई सेंट्रल (mumbai central) - अहमदाबाद (ahmedabad) वंदे भारत (vande bharat) एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल (revise schedule)केला आहे.
24 ऑगस्ट 2024 पासून नवीन वेळापत्रकाप्रमाणे ही ट्रेन धावणार आहे. "प्रवाशांना नवीन वेळापत्रकातील माहितीची पडताळणी करण्याचा आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाच्या योजना आखण्याचा सल्ला दिला जातोय," असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन आता मुंबई सेंट्रल येथून दुपारी 3: 45 वाजता सुटेल. सध्या ही ट्रेन दुपारी 3:55ला सुटते. याचाच अर्थ आता ही ट्रेन 10 मिनिटे लवकर सुटणार.
बोरिवली येथे ही ट्रेन 4:10 वाजता पोहोचेल आणि 4:13 वाजता सुटेल. सध्या या ट्रेनची बोरिवलीला पोहोचण्याची वेळ ही 4:20 आणि 4:23 आहे.
वापी येथे सुधारित वेळापत्रकानुसार ही ट्रेन 5:40 वाजता पोहोचेल आणि 5:42 वाजता वापीहून सुटेल, सुरत येथे ही ट्रेन 6:38 वाजता पोहोचेल आणि 6:43 वाजता सुटेल. तसेच वडोदरा येथे रात्री 8:11 वाजता पोहोचेल आणि 8:14 वाजता सुटेल. अखेर अहमदाबादला ही ट्रेन रात्री 9:15 वाजता पोहोचेल. जी सध्याच्या 9:25 च्या पोहोचण्याच्या वेळेपेक्षा दहा मिनिटे लवकर असेल.
हेही वाचा