Advertisement

Mumbai Local News: 2025 पर्यंत हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार

प्रकल्पासाठी भूसंपादन आणि झाडांचे सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

Mumbai Local News: 2025 पर्यंत हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार
SHARES

गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बर रेल्वे मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि झाडांचे सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

हा विस्तार प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून त्यानंतरच प्रवाशांना हार्बर मार्गावरून सीएसएमटीवरून थेट बोरिवलीला जाता येणार आहे.

या प्रकल्पसाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. प्रकल्पात येणारी झाडे, भूसंपादन यासह विविध सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच मार्गिकेचे संरेखन नियोजन आणि पुलांचे सामान्य रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरू आहे.

तर झाडांचे सर्वेक्षण आणि भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

हार्बर मार्गावर सीएसएमटी – पनवेल, सीएसएमटी – अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावतात. तर गोरेगाव – पनवेल लोकलही सुरू झाल्या आहेत. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी – अंधेरीपर्यंत हार्बर सेवा सुरू होती.

सीएसएमटी येथून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करून पुढे पश्चिम रेल्वेने प्रवास करीत होते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हार्बर सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मार्च २०१९ पासून गोरेगावपर्यंत लोकल धावू लागल्या. आता हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विस्तारिकरणाचे काम पश्चिम रेल्वे करीत आहे.

सध्या बोरिवलीपर्यंत पाच मार्ग असून सहावा मार्गही उभारण्यात येणार आहे. भविष्यात हार्बरच्या आणखी दोन मार्गिकांची भर पडणार आहे. त्यामुळे बोरिवलीपर्यंत आठ मार्गिका असतील.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने भविष्यात हार्बर मार्गाचा बोरिवलीपासून विरारपर्यंत विस्तार करण्याचे नियोजन केले आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा